आपलं मुलुंड

सौं . प्रमिला प्रभाकर सावंत
९०३, श्रीराम अपार्टमेन्ट मुलुंड पूर्व

आपलं मुलुंड      

.
आपलं मुलुंड ,आपल्या लाडक्या मुंबईचं शेंडेफळ .शेवटचं उपनगर. या मुलुंडचं पूर्वी मुळुंद असं नाव होत .पण कालांतराणे अपभ्रंशाने मुलुंड असं नाव झालं. हे कोळी समाजाचं गाव होतं. मुलुंड मधे दोन विभाग आहेत मुलुंड पश्चिम आणि मुलुंड पूर्व 
.
मी चव्वेचाळीस वर्षा पूर्वी या मुलुंडच्या प्रेमात पडले. आणि राहायला आले. तेंव्हाचं निसर्गरम्य हिरवेगार मुलुंड होतं . छोटे रस्ते, दुतर्फा हिरवीगार झाडे .एकदम शांत .गाड्यांचा आवाज नाही गडबड नाही.आता मात्र मुलुंडने हातपाय पसरायला सुरवात केली .छोटे उपनगर मोठे झाले .या मुलुंड मधे काय नाही ! नाट्य रसिकांसाठी कालिदास नाट्यगृह कालिदास क्रिडा संकुल सिनेमागृह मोठमोठी उद्यानं,मॅाल ,मोठी मंदीरे ,टोलेजंग इमारती . मुलुंडचा एकदम कायापालट झाला .मुलुंडला जशी उच्चभ्रूवस्ती तशीच मध्यमवर्गीय ,गरीब पण वस्ती ,छोटे छोटे नगर,पाडे कांही विचारू नका .
.
मुलुंड पश्मिमेला गुजराथी वस्ती आणि गजबजलेलं .पण मुलुंड पूर्व तसं लहान ,प्रदूषण विरहित शांत .मुलुंडच्या एका बाजूला आरेचा डोंगर शिपाया सारखा उभा तर दुसऱ्या बाजूला पसरलेली खाडी ,इथून मुंबईला सर्व बाजूने जोडलेले रस्ते .मुलुंड पूर्वेला मोठी दोन उद्याने चिंतामणी देशमुख उद्यान आणि संभाजी पार्क ,या मुळे मुलुंडच्या सौंदर्यात भर पडली तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेली आपली मराठा मंडळाची वास्तू दिमाखात उभी आहे . तीथे होणारे कार्यक्रम हे मुलुंडचे आकर्षण आहे . आपल्या मुलुंडमधे सणवार मोठ्या उत्सात साजरे केले जातात .१५ ॲागस्ट मैदानात सार्वजनिक झेंडावंदन होते तर गुढीपाडव्याची शोभा यात्रा टआपल्या संस्कृतीची आठवण करून देते .शिवजयंती मिरवणूक आपल्याला स्फुर्ती देते. या सणांच्या वेळी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात .मुलुंड मधे सर्वधर्मीय लोक आहेत पण मराठीपण जपणारं मराठी माणसांचं मुलुंड म्हटलं जातं .
.
मुलुंड मधील माणसं एकमेकांना मदत करणारी ,प्रसंगाला उभी राहणारी अशीच आहेत ,आणि मुलुंडच्या निसर्गाने त्यांना साथ दिली आहे .मी मुलुंडमधे राहते म्हटल्यावर  लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो . खुप सुंदर आहे तुमचं मुलुंड म्हटलं जातं आणि खरंच आहे वड,पिंपळा सारखी मोठी झाडे , गुलमोहर, बहावा सारखी वसंतऋुतूत फूलांनी बहरलेली झाडे ,त्या वर पक्षांचा किलबिलाटही या मुलुंड मधेच . मी मुलुंड मधे राहते याचा मला अभिमान आहे .असं हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं ,सांस्कृतिक वारसा लाभलेलं आपलं मुलुंड आणि  “मी मुलुंडकर “


Leave a Reply