आपलं मुलुंड

 सौ. कल्पना राणे : निवृत्त शिक्षिका                                                                                                                                                                                                                              आपलं मुलुंड

माझं, मुलुंड, मुलुंड,सांगू किती गोड कौतुक.
 
“उपनगरचा राजकुमार”सर्वांनी एका त्याचे गुणगान!आपलं आपलं म्हणता केव्हा माझं झालं कळलच नाही.मे १९६६ मध्ये लग्न झालं,व ठाण्याला दिव्यांच्या कडे राहायला आलो.हळुहळू स्वत:ची जागा घेण्यासाठी भ्रमंती सुरू झाली.बऱ्याच जागा बघितल्या व मुलुंड वर शिक्का मोर्तब झालं.मुलुंड पुर्वेला स्टेशन पासून अगदी चालण्याच्या अंतरावर आमचे घर, तेव्हाच मुलुंड आणि आताच मुलुंड अगदी जमीन अस्मानाचा फरक!
.
संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो की मिठागर रोडला बांबू चे बन, भातशेती,भाजीचे मळे,नजरेस पडायचे.पण हळूहळू इमारती उभ्या राहिल्या केंव्हा ते कळलेच नाही.मुलुंडची वस्ती म्हणजे सुशिक्षित, शिस्तप्रिय,सर्व धर्मांचे लोक ते गुण्यागोविंदाने राहतात.मुलुंड हे मुंबई शहराचे एक शेवटचे उपनगर आहे.मुलुडमध्ये फोर्टीज, हॉस्पिटल, मुलुंड कॉमर्स, व केळकर कॉलेज आहे.जेष्ठासाठी ‘विरंगुळा” केंद्र आहे.जिमखान्यामुळे मुलांना वेगवेगळ्या खेळांचा चांगला सराव करता येतो.संभाजी पार्क, देशमुख उद्यान, यामुळे मोकळ्या जागेत फिरता येते तसेच तेथील खेळाच्या साधनांमुळे मुलांना आनंद मिळतो.मराठा मंडळ, महाराष्ट्र सेवा संघ,अशा संस्थां मुळे,नाट्य संगीत मनोरंजन व माहितीपुर्ण कार्यक्रमाचा लाभ होतो.
.
तुंगवतेश्र्वर, खंडोबा, गणपती,अशा देवळामुळे येथे होणाऱ्या आध्यात्मिक कार्यक्रमामुळे सर्वांना मानसिक, समाधान मिळते.तसेच महिला मंडळ, भजनी मंडळ, नृत्य, संगीत योगा. वर्ग भरतात.वाचनाची हौस भागविण्यासाठी वाचनालये आहेत.एकूण काय आपण मुलुंड कर खूप भाग्यवान आहोत. ‘आपलं मुलुंड’ भरभरून देतेय.जागतिकरणामुळेतर मुलुंड च काया पालटच झाले आहे.जुन्या इमारती कंपन्या जाऊन टॉवरच टॉवर परदेशातल्या प्रमाणे R malls,D marts, दिसू लागलेत.उपनगरच्या राजकुमार च्या (मुलुंडच्या) घोडदौडी बरोबर संसाराची घोडदौड चालूच होती.विद्यापिठाच्या पदव्यांप्रमाणे  आई, सासू, आजी, पणजी, मिळतं गेल्या.
.
        “माझं मुलुंड, मुलुंड माझी                               
          माय माझी सखी,
          मला फुलविले,
          मला सांभाळीले तिने
          हे तर जन्मो जन्मीचे 
          नाते”

 



Leave a Reply