आपलं मुलुंड

सौ. चित्रलेखा शिंदे
नीलम नगर, मुलुंड पूर्व

आपलं मुलुंड

सकाळी लवकरच खाली उतरले. वाटले चालणेही होईल आणि स्टेशन पर्यंत जाऊन फळे व भाज्या आणता येतील. पण बंद दुकानें, ट्रेन ची धडधड नाही, रिक्षांचे आवाज नाहीत असे वाटले हे आपलेच मुलुंड आहे काय? मन सुन्न झाले. 
.
आपल्या आयुष्यात दोन ठिकाणे असतात पहिली जन्मभूमी, दुसरी कर्मभूमी. पहिली अंगाखांद्यावर खेळवते,संस्कार देते दुसरी आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावरील जीवन परिपूर्ण करण्यासाठी, मुलांचे संगोपन, घर आर्थिक सक्षमता येण्यासाठी धडपड करायला शिकवते. ती क्षमता मला मुलुंडने दिली लग्नानंतर चार वर्षात मुलुंड ला राहायला आलो, आणि मी मुलुंडला व मुलुंडने मला आपलेसे केले. 
.
मुलुंड चे मुलं नाव मूल -कुंद  असे होते  मुंबई चे ठाण्याला लागून असलेले शेवटचे एक नियोजित शहर, रस्त्यांनी दुतर्फा  हिरवीगार झाडें, स्वच्छता प्रेमी उच्चभ्रु सुशिक्षित मध्यमवर्गीय  लोकवस्ती. मुलुंड मधील मुळचे स्थानिक आगरी, कोळी बांधव मिठागरे, खाड्या मच्छिमारी हे पारंपरिक व्यवसाय अजूनही करताना दिसतात. गेल्या 15 ते 20 वर्षात मुलुंडने कात टाकली आहे, अनेक विकासकांनी मुलुंडचा चेहरा मोहरा बदलून नवी झळाळी दिली आहे. सिमेंटच्या भव्य दिव्य विशाल नगरीत  मूळचा गावरानपणा हरवून गेला आहे. 
.
आम्ही प्रथम राहायला टाटा कॉलनी मध्ये आणि आमचा व्यवसाय मुलुंड पश्चिम कडे पी. के. रोड वर त्यावेळी पूर्वे कडून पश्चिमेकडे जायला बस नव्हती त्यामुळे मुलांचे व घरातील सर्व कामे उरकून शॉप वर रोज चालत जायचे 50 मिनिटे लागायची. व्यवसायाने एक गोस्ट मात्र होते ओळखी वाढतात, लोकांशी वैचारिक देवाण घेवाण होते. व्यवसाय वाढत होता नवे घर घेतले नवीन शॉप मुलुंड पूर्वेला घेतले दोन्हीकडचे व्यवसाय सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागे पण दिवस आर्थिक नियोजनाचे असल्याने मुलुंडने मला आर्थिक बळ तर दिलेच पण लोकसंग्रह ही वाढला, व्यवसायाने स्वभाव धाडसी बनला, लोकांची पारख करायला शिकले. मुलांची शिक्षणे मुलुंडला शाळा, कॉलेज चांगली असल्याने ती आज परदेशात उच्चपदावर कार्यरत आहेत. 
.
मुलांच्या कर्त्यव्या तुन मुक्त झाल्यावर आपले छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन देणारी मराठा महिला मंडळ, आराधना मंडळ अशी मंडळे मुलुंड ने दिली.  काय नाही आहे आपल्या मुलुंड मध्ये? छोटी, मोट्ठी उद्याने, नाट्यगृह, तरणतलाव, मॉल्स, हॉटेल्स, थिएटर, जेष्ठ नागरिक संघ,जॉन्सन कंपनी, रिचर्डसन क्रुडास कंपनी  प्रत्येक ज्ञाती समाजाची मंडळे,  त्यातून होणारी त्यांची वैचारिक प्रगती. मुलुंडमध्ये कित्येक वर्षे गुजराती, मारवाडी, केरळी, कोळी, मराठी सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.कोकण वासियांची खाद्यसंस्कृती मासे, गवाणपाड्यातील ताजा  मासळी बाजार जिव्हा तृप्त करतो,मुलुंडला पश्चिमेकडील भरणारा भाज्यांचा व फळांचा बाजार डोळ्यांना हिरवागार थंडावा आणतो व शाकाहारी लोकांना स्वादाचा आनंद देतो.  गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दुर्गा उत्सव, अय्यपा पूजा एकत्रितपणे साजरा करतात. आता मेट्रो सुरु होईल, फ्री वे मुलुंडला जोडतील. 
.
मुलुंडला हायवे वरून पूर्वेला आत येण्यासाठी ट्रॅफिक खूप जाम होते ते टाळण्यासाठी लवकरात लवकर केळकर कॉलेज जवळचा मार्ग सुरु करायला हवा, 4 वर्षांपूर्वी झालेली झाडांची कत्तल पाहून मन विषन्न झाले होते.  मुलुंड मधील सामाजिक कार्य करणारे सर्व नगरसेवक जनमानसात मिसळून कामे करतात. कोणत्याही संकटसमयी मुलुंडकर एकत्र येतात. 
.
मुलुंड इतके आपलेसे आहे कीं एकही रस्ता, दुकान अनोळखी राहिले नाही. सर्व दुकानदार प्रेमाने वागतात  भाजीवाला भैया असुदे नाहीतर हातचलाखीने गजऱ्याचे मापं मारणारी यल्लवा असुदे  त्यांच्याशी इतकी जवळीक झाली आहे कीं हक्काने जास्तीच्या गोष्टी मागून घेऊन शकतो आणि ते पण हसत हसत देतात. मला जिवाभावाच्या मैत्रिणी पण मुलुंड नेच दिल्या, मुलुंडने सांस्कृतिक, सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक, औद्योगिक अशा विविध स्तरावर उपक्रम राबवून सामाजिक स्तर उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे आणि सतत नाविन्याचा स्वीकार केला आहे. 
.
म्हणून म्हणतेय हे मुलुंड आपलं आहे आपलेच काय सर्व मुलुंडकरांचे आहे.  मला राजकपूर चे गाणे आठवतेय “जिना  यहाँ मरना  यहाँ मुलुंडके सिवा जाना कहाँ “


Leave a Reply