संकलन ….
सौ.विजया. शा.साटम
नमस्कार मैत्रीणींनो…..!
.
आपल्या सर्वांची आवडती गायिका आशा भोसले यांच्या जीवनपटावर आजचा लेख आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना काही दिवसांपूर्वी २०२० चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने जाहीर केला.
आशा भोसले भारतीय लोकप्रिय गायिका आहेत. आशा भोसलेंनी गजल,भजन,शास्त्रीय संगीत तसेच फिल्म गीत यासाठी आवाज दिला.१९४० च्या दशकात गायला सुरुवात केली.
आशाजींचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली महाराष्ट्रातील सांगली गावी झाला. त्यांचे वडील श्री दिनानाथ मंगेशकर चांगले गायक व नायक होते. वडिलांनी त्यांना लहान वयातच शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले.आशा ९ वर्षाची असताना वडिलांचे निधन झाले. आशा ची मोठी बहीण लता मंगेशकर यांनी घर चालवण्यासाठी अभिनय आणि गायनाला सुरुवात केली आणि लता मोठी गायिका झाली.
.
आशाची गायनाची सुरुवात मराठी फिल्म माझं बाळ पासून झाली. १९४८ मध्ये हिंदी फिल्म चुनारिया मध्ये पहिले गाणे गायिली. त्यानंतर संगदिल १९५२, अंजाम १९५२, अलादिन और जादुई चिराग १८५२, परिणीता १९५४, बुटपाँलिश १९५४, अलिबाबाऔर ४० चोर १९५४, देवदास १९५५,नयादौर १९५५ अशी आशाने गाणी गायिली .
.
१९४९ मध्ये,१६ वर्षीय आशाने आपल्या पेक्षा मोठ्या असलेल्या गणपतराव भोसले शी प्रेमविवाह केला. घरच्यांचा विरोध होता. काही वर्षानी आशा आईच्या घरी आली. आशाजीना तीन मूले होती. मुलांची जबाबदारी असल्यामुळे आशाने गाण्यामध्ये जास्त लक्ष घातले. मराठी, हिंदी व अनेक भाषा मध्ये गाणी गायिली. आता पर्यंत २०हजार पेक्षा अधिक गाणी गायिली. आशा भोसले ची लोकप्रिय तुमसा नही देखा,१९५७,मदर इंडिया१९५७, तिसरी मंजिल १९६६, उमराव जान१९८१, रजिया सुलतान १९८३, उत्सव १९८४ ,चाँदनी १९८९, लेकिन,१९९०, बाजीगर १९९३, रंगिला १९९५ कहो ना प्यार है २०००, देवदास २००२,तिसरी आँखे २००६.
.
आशा भोसलेची लोकप्रिय गीते १. परदे मे रहने दो परदा ना हटावो २. दम मारो दम मिट जाये गम ३. हरे राम हरे कृष्णा ४. गरीबोंकी की सुनो वो तुम्हारी सुनेगा ५. दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीये ..अशी छान छान गाणी आवडली आहेत.
.
आशा भोसलेनी देश विदेश मध्ये स्टेज शो केले .भारतीय संगीत लोकप्रिय केले. आज आशा जी गाणी गात आहेतच पण व्यवसाय पण करतात दुबई व कुवेत मध्ये रेस्टाँरेंट आहेत.
आशा भोसलेनी आर.डी.बर्मन बरोबर तिसरी मंजिल १९६६, अपना देश १९७२, यादो की बारात इ.चित्रपटात गाणी गायिली. .आर डी.बर्मन बरोबर १९८० मध्ये विवाह केला. आशाजीना तीन मुले, मोठा मुलगा हेमंत भोसले पायलट आणि संगीतकार होता. २०१५ मध्ये त्याचे कर्करोग या दुर्धर आजाराने निधन झाले. मुलगी वर्षा स्तंभ लेखक होती आणि छोटा मुलगा आनंद मँनेजर आहे .सातवेळा आशा भोसलेना सर्व श्रेष्ठ गायिकेचा पुरस्कार मिळाला.
.
१९८९ मध्ये मध्य प्रदेश सरकार चा लता मंगेशकर पुरस्कार . २०००मध्ये दादा साहेब पुरस्कार. २००१ मध्ये फिल्म फेयर लाईफ टाईम पुरस्कार २००२ मध्ये बीबीसी लाईफ टाईम पुरस्कार, २००८ मध्ये पद्म विभुषण पुरस्कार. अशा प्रकारे आशाजीनी सर्वाची नावाप्रमाणे आशा पुर्ण केली.
.
धन्यवाद!!