1. समाजात प्रेम व ऐक्यभाव निर्माण करुन समाजाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रिडाविषयक अशी सर्वागीण सुधारणा घडवून आणणे व त्या करिता झटणे.
2. समाजात शैक्षणिक अभिरुची निर्माण करुन गरजू / होतकरु अशा विद्यार्थास आर्थिक व अन्य प्रकारचे मार्गदर्शन / शक्यतो सहाय्य करणे. वाचनालय, अभ्यासवर्ग, विद्यार्थी वसतीगृह, शाळा, महाविद्यालय इत्यादी स्थापण्याचा व चालविण्याचा प्रयत्न करणे.
3. सभागृह, मंगल कार्यालय, सांस्कृतिक केंद्र इत्यादी निर्माण करणे, चालविणे व त्यासाठी स्वतःची सर्व सोयी-सुविधायुक्त अशी भव्य वास्तू उभारणे.
4. शासकीय योजनांचा, उपक्रमांचा ज्या ज्या वेळी सामुदायिक संघशाक्तिने फायदा मिळविण्यासारखा असेल त्या त्या वेळी आपला ज्ञाती बांधवाना मिळवून देण्याचा प्रयत्न करणे उदा. समाजातील सुशिक्षित बेकाराना प्रशिक्षित करुन त्यांना उद्योग-धंदे व नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणे.
5. सभासदांच्या मुलां-मुलींनी मिळविलेल्या शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील विशेष प्राविण्याबद्दल सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देणे. शिवाय समाजातील इतर सभासदांनी मिळविलेल्या सामाजिक व अन्य क्षेत्रातील विशेष प्राविण्याबद्दल त्यांचा सत्कार/ गौरव करणे.
6. मराठा समाजातील युवक-युवती, महिला यांच्या उन्नतीच्या व परस्पर सहकार्याच्या योजना हाती घेणे.
7. मराठा समाजातील उपवर मुला-मुलींचे विवाह विषयक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे विवाह जुळविण्यासाठी पालकांना सहाय्यभूत ठरेल अशा प्रकारची वधू-वर सूचक समिती स्थापणे व नोंदणी उपक्रमाव्दारे मार्गदर्शन करणे, चालविणे.
8. समाजाच्या उन्नतीसाठी जी जी कामे, योजना, उपक्रम इत्यादी वेळप्रसंगी उपलब्ध होतील त्या त्या वेळी त्यांचा समाजासाठी उपयोग करुन घेणे. मराठा समाजातील अनाथ, निराधार, अपंग, विकलांग अशा गरजू व्यक्तिस शक्य ती सर्व प्रकारची मदत करणे.
9. मुंबई अथवा अन्यत्र असणाऱ्या आपल्या इतर ज्ञातीसंस्था किंवा अन्य संस्था/ मंडळांशी आपल्यामंडळाचा संपर्क ठेऊन समाज उन्नतीस पोषक वातावरण निर्माण करणे, आवश्यकतेनुसार अशा संस्था /मंडळाशी विशिष्ट कारणासाठी एकत्र येऊन कार्य करणे.
10. कोणत्याही राजकीय पक्षाची प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षपणे बांधिलकी न ठेवता समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे.