आपलं मुलुंड

सौ. मनीषा सावंत
दीप लक्ष्मी मुलुंड पूर्वे
अधिपति सेविका जे जे रुग्णालय सेवा निवृत

आपलं मुलुंड

आपलं मुलुंड म्हटलं की त्यांतच मुलुंडचा आपलेपणा जाणवतो. महाराष्ट्रामध्ये मुंबई जी आपली महाराष्ट्राची  राजधानी आहे.शिवाय आथिर्क राजधानी आहे.अशा मुंबईच्या एका उपनगरात आपण राहतो या गोष्टींचा आपल्याला अभिमान आहे.शिवाय अभिमान करण्यासारखच आपलं मुलुंड आहे.यात शंका नाही.
.
मुलुंडला बराच इतिहास आहे पण तो मी लिहीत नाही.मुबंईच्या मध्य रेल्वेचे हे शेवटचे रेल्वेस्थानक आहे. या उपनगराला उत्तम पाणी पुरवठा, हे असल्यामुळे येथे सर्व प्रकारच्या माणसांची गर्दी दिसते.येथेसर्व प्रकारच्या धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.ह्या उपनगराचे नियोजन चांगले अस ल्यामुळे येथील रस्ते सुध्दा चांगले आहेत.
.
आपल्या पुरलेला बघितले तरी मुलंड जिमखाना, आपल्या ला नियमित व्यायाम करा,योगा करा,आपले स्वाथ चांगले ठेवा असं सुचवत असतो. शाळा  महाविद्यालये आपल्या मुलुंड मध्ये उत्तम आहेत.त्यामधून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ,चित्रकार, कलाकार, इत्यादी आहेत.
.
मनोरंजनासाठी खुप प्रकार आहेत.नाट्यगृहे,मॉल, आहेत.शिवाय मुलुंडमध्ये ठिकाणी उद्याने आहेत.त्यात वेगवेगळे भाग आहेत,त्यात लहान मुले जेष्ठनागरिक यांची खास सोय दिसते. रस्त्यात ठिकठिकाणी बकुळीच्या फुलांची झाडे असल्या मुळे सुगंध दरवळत असतो.वाटेत सावलीही मिळते.
.
जेष्ठ नागरिकांचे हास्य क्लब आहेत.तेथे जेष्ठनागरीक आपला वेळ अगदी मजेत घालवतात.आपल्याकडे ग्रंथालपण आहे.त्याठिकाणी तुम्ही आपली वाचनालयाची आवड जोपासू शकता.ज्ञानात भर होते ती वेगळीच.
.
दवाखान्याची सोय सुध्दा चांगली आहे.निसर्गरम्य मुलुंड सोडून कोठे जायची कल्पनाच करता येत नाही.लग्न होऊन मुलुंडला आले,पण त्यांने मला माहेरपेक्षाही  जास्त प्रेम, आपलेपणा, दिला यासाठी मी शतशः ऋणी आहे.
.
मराठा मंडळाने तर मुलुंडला जिवंतपणा आणला आहे.सतत वेगवेगळे कार्यक्रम, प्रत्येकाच्या कलेला वाव देते.आपली पुढची पिढी चांगली तयार होत आहे.त्यांची मदत होत आहे. शांत रमणीय मुलुंड बद्दल लिहिणे संपणारच नाही.
       

 



Leave a Reply