सौ.माधुरी मा.तळेकर.
लोक गौरव, मुलुंड (पश्चिम)
आपलं मुलुंड
.
आपलं मुलुंड म्हणायला किती सुंदर वाटत ना, आम्ही मुलुंड ला २००० साली राहायला आलो. खरच मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी मुलुंडकर आहे. हळूहळू मी मुलुंडचा कायापालट होताना पहातेय.इथे काय नाही. हे मुलुंड पाहू किती सुंदर आहे.अतिशय सुंदर निसर्गाने नटलेले आणि वेगवेगळ्या देवी देवतांची मंदिरे जसे, स्वंयभू बालराजेश्वर मंदिर आहे. अंबेमातेच मंदिर, जैन मंदिर आहे. तसंच अयप्पाची देखणी मूर्ती अस मंदिर आहे. ज्याच नांव घ्यावच लागेल असं तुंगवतेश्वर आणि हरीहरेश्वर अशी सुंदर मंदिरे आहेत.
.
भव्यदिव्य मुलुंड ची शान असंलेल ‘कालिदास’ नाट्यमंदिर. तिथे उत्तमोत्तम कार्यक्रम, मराठी, गुजराती, अशी वेगवेगळ्या भाषेतील नाटके होतात.त्याच प्रमाणे ‘अपना बाजार’ आहे. ‘महा.सेवा संघ’ ही अतिशय जुनी वास्तु, तेथे वेगवेगळे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. वि.स.खाडेकर वाचनालय आहे.वाचन प्रेमी वाचनाचा आनंद मनमुराद घेऊ शकतात. कालिदासा नाट्य मंदिराच्या ठिकाणीच,स्विमिंग पुल आहे. वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. त्याठिकाणचा परिसर एकदम स्वच्छ आणि मनप्रसंन्न करणारा आहे.फोर्टीस हे सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल. येथे ह्रदय ट्रांसप्लॉटही केलं जातं. अतिशय स्वच्छ. असलेले, वेगवेगळ्या आजारांवरील स्पेशालिस्ट डॉ. इथे आहेत.मॉलच काय सांगू डीमार्ट’, आरमॉल,बिग बजार… इथे घरगुती सामान, कपडे एकाच ठिकाणी सर्व वस्तु उपलब्ध आहेत.त्यांप्रमाणे सिनेमा गृह पीव्हीआर, आरमॉल इथे उत्तमोत्तम चित्रपट पाहू शकतात. अतिशय चविष्ट पदार्थ जेवण मिळणारी आमंत्रण, अतिथी, निसर्ग, विश्वसम्रांट अशी हॉटेल्स आहेत.अतिशय उत्तम अशा शाळा आहेत.मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या.आणखी त्यात आता मेट्रो ही तीन चार वर्षीत होणार आहे.भाजीपाला फळ उत्तम प्रकारची मिळतात. तुम्हाला कोणत्याही खरेदीसाठी बाहेर जावं लागत नाही. मुलुंड पुर्वेला मासे खाद्य प्रेमींसाठी मासळी बाजारही मोठा आहे.
.
मुलुंड पूर्व अतिशय शांत असं ठिकाण. मी प्रथम वर्णन करेन भव्यदिव्य अशी मराठी ज्ञातीची वास्तु ‘मराठा मंडळ’ आणि मला त्याचा अभिमान आहे की मी या वास्तुची एक छोटीशी कार्यकर्ती आहे. तिथेच मला खुप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या आहेत.लग्नसमारंभ, वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम, रक्तदान शिबीर, डॉ.मार्गदर्शन वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.महिलांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.मंडळाचे अध्यक्ष मा.रमेशजी शिर्के यांचे मार्गदर्शन उत्तम प्रकारे लाभते.
.
मुलुंड जिमखाना येथे सर्व प्रकारचे खेळ आयोजित केले जातात. त्याच प्रमाणे ‘केळकर कॉलेज’आहे. एम.सी.सी कॉलेज आहे. मुलुंड मध्ये उत्तम दर्जाच्या मराठी, गुजराती, इंग्रजी, माध्यमांच्या शाळा आहेत.संभाजी उद्यान, जिथे जेष्ठनागरिक, तरूण, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यायामाची उपकरणे आहेत. पेपर वाचू शकतात. सुंदर उद्यान आहे. तसच ‘चिंतामणी उद्यान आहे. तिथे पण सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. वीर सावरकर आणि अग्रवाल ही सार्वजनिक हॉस्पिटल आहेत.
.
माझी मुले इथेच लहानाची मोठी झाली. आहेत..वैभवशाली,शांत, सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, तसंच चित्रकार,लेखक,लेखिका, खेळाडू कलाकार असे समृद्ध असे आपले मुलुंड. हे मुलुंड उपनगर मुंबईची शान आहे. आणि मला सार्थ अभिमान आहे मी मुलुंडकर असल्याचा !
.
तुम्हीच सांगा असायलाच हवा ना ! मुलुंडने मला भरभरुन दिलय. मुलुंडचं कौतुक हे व्हायलाच हवं ना !