सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजिला ज्यांनी !
अनंत त्यांची जीवनयात्रा कधी न सरे मरणानी !!
तेथे कर आमुचे जुळती

         

कै. वसंतराव रघुनाथ सकपाळ

     

कै. धनाजीराव दिपाजीराव कदम

         

मंडळाचे पहिले अध्यक्ष व भाग्यविधाते वसंतराव रघुनाथ सकपाळ यांच्या दि. ५ जुलै १९८८ रोजी झालेल्या दु:खद निधनाने मंडळाचे अपरिमित नुकसान झाले. कै. वसंतराव हे मंडळाचे एक खंबीर आधारस्तंभ होते. समतोल व ओघवते वकृत्व, सुंदर हस्ताक्षर, साहित्यिक व अभिरुची संपन्न लिखाण, कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम करणारे एक लाघवी व्यतिमत्व होते.. मंडळासाठी भूखंड मिळविण्यासाठी मूळ कल्पना त्यांचीच व तो मिळविण्यासाठी सुध्दा त्यांनी अपार कष्ट केले. त्यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना '' दादा" म्हणून संबोधित असू . समाजरूपी जगन्नाथाचा हा रथ कै. वसंतरावाच्याच शुभाशीर्वादाने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

     

मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. धनाजीराव कदम हे एक भारदस्त, तडफदार व हरहुन्नरी व्यतिमत्व. दि. २२ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांच्या अकाली निधनाने आम्हा कार्यकर्त्यांच्या पाठीवर पुन्हा एकदा क्रूर काळाने आसूड ओढला. कै. वसंतरावांच्या पाठोपाठ केवळ चारच महिन्याने कै. धनाजीरावांचे निधन झाले. महाराष्ट्र शासनामध्ये मजूर व सहकारमंत्री ना. शंकराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी शासकीय सेवा केली. गुहागर तालुक्यातील भातगाव उन्नती मंडळ व गुहागर विकास मंडळाचे आधारस्तम्भ होते. भरदार देह्दृष्टीचे धनाजीराव आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे आदरणीय 'अण्णा' होते

कै. चंद्रकांत गणपत देसाई

कै. राजाराम शंकर महाडिक

मंडळाचे माजी अध्यक्ष कै. चंद्रकांत गणपत देसाई यांचेही दि. १३ जून २००० रोजी अकाली निधन झाले. मंडळावर सुमारे बारा वर्षांनी आणखी एक दुर्दैवी आघात झाला. कै. देसाई हे १९९५ ते १९९८ पर्यंत मंडळाचे कार्याध्यक्ष होते तर ११-१०-१९९८ पासून मृत्यु पर्यंत ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. १९९७ साली प्रसिध्द करण्यात आलेल्या स्मर्णिकेच्या वेळी कै. दादा देसाईनि अपार मेहनत घेऊन जाहिराती व देणग्या मिळवून दिल्या. मंडळाच्या कार्याला एक निश्चित दिशा आणि आधार व आकार देण्याचे काम दादांनी सम्पर्नाच्या भावनेने केले. कै. चंद्रकांत देसाई यांचे सुपुत्र कला दिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकात देसाई यांचे नाव चित्रपट क्षेत्रात आज अपूर्व तेजाने झळकत आहे. कै. दादानी या गुणी सुपुत्राच्या रूपाने केवळ रुपेरी दुनियेला, मराठा मंडळाला किवा मराठा समाजाला नव्हे तर अवघ्या भारत वर्षाला एक अमोल अशी देणगी दिली आहे. याच त्यांच्या कर्तबगार सुपुत्राने मंडळास भरघोस देणगी देऊन मंडळाच्या इमारतीतील " कै. चंद्रकांत ग. देसाई सभागृह " म्हणून आपल्या वडिलांची स्मृती चिरंतन जपली आहे.

विजया दशमीच्याच दिवशी दि. ९ ऑक्टोबर २००८ रोजी मंडळावर क्रूर काळाने अत्यंत निष्ठुरपणे घाला घातला. कै. राजाराम महाडिक हा मंडळाच्या भक्कम असा आधारवड होता. अगदी अकस्मातपणे तो उन्मळून पडला. काही काळ आम्ही सर्वजण संभ्रमित आणि प्रचंड दु:खी झालो. एक अत्यंत निगर्वी , लाघवी , कष्टाळू ,प्रेमळ व मंडळासाठी खरोखरच झिजणारे व्यतिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. कै. महाडिकानी मंडळाचे सहचिटणीस, सरचिटणीस व कार्याअध्यक्ष अशी विविध पदे भूषविताना आपली कार्यक्षमता सतत प्रज्वलित ठेवली. आपल्या संपूर्ण आयुष्यात अत्यंत चोख व्यवहारी असणारे राजादादा त्यांच्या काड्वलि पंचक्रोशीतील सर्व शैक्षणिक व सामजिक तसेच ग्रामदेवतेच्या धार्मिक कार्यात नित्यनियमाने सहभागी होत असत. देवीचे आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे जपणारे राजादादा ग्रामीण जनतेचे श्रद्धास्थान होते.
 
 

 

   
 
     
 
 
         
Maratha Mandal Mulund, Maratha Mulund, Maratha Mandal Mulund Mumbai, marathamandalmulund.com, Maratha Vadhu Var Suchak Mandal, Marriage Hall in Mulund
 
All Rights Reserved. Copyright 2012 Maratha Mandal Mulund.
Site Designed & Developed By Arun Chavan