वधू वर सूचक व्यवस्था

 

शिवजयंती उत्सव

 

मराठा समाजातील उपवर -वधू - वरांचे विवाह जुळविण्याकरिता सहाय्यभूत व्हावे म्हणून गेली १४/१५ वर्षे कार्यरत असलेला वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह जुळविण्याचे फार मोठे सामाजिक कार्य मंडळाने अविरत चालू ठेवले आहे. या वर्षामध्ये एहुन ३८१ विवाहनुरूप तरुण तरुणींची नावे नोंदवण्यात आली आहेत. एवढ्यामोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यामुळे मंडळाचा हा उपक्रम किंवा वधू वर सूचक व्यवस्था किती आवश्यक आहे याची साक्ष पटते.

     

हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी मंडळाची वधू वर सूचक समिती उत्तम प्रकारे काम करीत आहे. विशेषता महिला सदस्यानचा फारमोठा व उस्फुर्त सहभाग नेहमीच लाभत आहे. मंडळाच्या या वधू वर सूचक व्यवस्थेचे कामकाज दर शनिवारी संद्याकाळी ५.०० ते ७.०० व रविवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळात चालू असते. शनिवारचे व्यवस्थापन आमच्या माहिला सदस्या तर रविवारचे व्यवस्थापन पुरुष वर्गाकडून केले जाते.

     

शिवजयंती उत्सव
प्रतिवर्षी मंडळाच्या विद्यमाने छत्रपति शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव शासकीय जयंती दिनानुसार १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याही वर्षी हा जयति उत्सव १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.

                         
                   
 

मंडळाचा वर्धापन दिन - कोजागिरी पोर्णिमा

     

वार्षिक स्नेहसंमेलन

 

मंडळाची स्थापना १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरी पोर्णिमेच्या शुभदिनी झाली. प्रतिवर्षी कोजागिरी पोर्णिमा व त्याच दिवशी येणारा मंडळाचा वर्धापन दिन सातत्याने साजरा केला जातो. या वर्षी मात्र वर्धापन दिन १५ ऑक्टोबर हा दिवस एका आगळ्या वेगळ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण होऊन संपूर्ण इमारतीचे भोगवटापत्र महानगर पालिकेकडून मंडळास मिळाले. या स्वप्नपूर्तीचा आनंद सर्वांनी एकत्रित पणे उपभोगावा, मंडळाच्या कार्याचा प्रसार, प्रचार व सादरीकरण मोठ्या प्रमाणात व देखण्या स्वरूपात केला. मंडळाच्या सांस्कृतिक केंद्र इमारती समोरील रस्त्यावर भव्य सभा मंडप व तितकाच प्रशस्त रंगमंच उभारून उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या साठी कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून उभारलेले व्यासपीठ व त्यावरील देखणा रंगमंच अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. मंडळाच्या सांस्कृतिक केंद्राचे उदघाटन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा.ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते व खासदार श्री.संजय दिना पाटील, आमदार सरदार तारासिंह , आमदार शिशिर शिंदे, नगरसेवक श्री.प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक श्री. नंदकुमार वैती इ. मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

     

  या प्रसंगी मा.ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते श्री. नितीन चंद्रकांत देसाई याना एक सुंदर व संस्मरणीय अशी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी श्री. रमेश शिंदे यांच्या सौजन्याने संकल्पित केलेल्या सरस्वती वाचनालयाचे उदघाटन सुद्धा ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या दिवशी सकाळ पासूनच इमारतीमध्ये विविध धार्मिकविधि बरोबरच श्री. जनार्दन वामन राणे यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे क्षात्रतेज श्री तुळजाभवानी मातेच्या सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना व त्या छोटेखाणी मंदिराचा शुभारंभ करण्यात आला. या नेत्रदीपक अशा सोहळ्याप्रसंगी दूरदर्शनवर गाजलेला " मराठी पाउल पडते पुढे !" हा विविध व लोकप्रिय कलावंतानी सादर केलेला देखणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्वांगसुंदर सभारंभासाठी उभारण्यात आलेला भव्य सभामंडप उपस्थितांनी ओसंडून गेला होता. यावेळी तळमजला व पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक पद्धतीचे प्लाझमा टी.व्ही. सेट्स बसविण्यात आले होते. अनेकांनी हा सोहळा त्या पडद्यावर पाहण्याचा आनंद लुटला. या नयनरम्य सोहळ्याचे संपूर्ण निवेदन सुप्रसिद्ध निविदिका उत्तरा मोने यांनी उत्तम प्रकारे केले. तमाम मुलुंडकरांबरोबरच मुंबई, उपनगरे , ठाणे , नवी मुंबई अशा विविध ठीकाणाहुन आलेल्या अनेक हितचिंतक मित्रांनी, सभासदांनी व काही संस्था प्रतिनिधीनि मुलुंड मराठा मंडळाच्या या सर्वांगसुंदर सोहळ्याचा मुक्त कंठाने गौरव केला.

     

मंडळाच्या स्थापनेपासून आजवर प्रतिवर्षी सातत्याने साजरे होणारे मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन हा एक आनंदायी सोहळा ! मंडळाचे सभासद व त्यांच्या कुटुंबियांचा, आप्तेष्टांचा परस्परांशी परिचय व्हावा, स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा त्याच बरोबर विद्यार्थी व गुनिजनांचा गौरव करण्यात यावा व या निमित्त समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभावे या विस्तृत भावनेने प्रतिवर्षी स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात येतो. या वर्षी मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा १६ ऑक्टोबर रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद बा. राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व गुनिजनांचा गौरवा बरोबर स्वरमंदिर प्रस्तुत "स्वरधारा" हा मराठी गीतांचा कर्णमधूर कार्यक्रम सदर करण्यात आला. या संमेलना साठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेकनोलोगी मुंबईचे व्हाईस चान्सलर प्रो. जी. डी. यादव व मुलुंड मधील सुप्रसिध्द अड्व्होकेट मा.श्री. एम.एन.देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

                           
                           
 

मंडळाची सहकुटुंब वार्षिक सहल

     

वैद्यकीय मार्गदर्शन

     

सामुदायिक गीताई पठण

 

मंडळाच्या वार्षिक परंपरेनुसार या वर्षी कौटुंबिक सहल दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सृष्टी फार्म नेरे पनवेल येथे अयोजीत करण्यात आली होती. मंडळाचे सहचिटणीस श्री. दिलीप रा. तळेकर यांच्या प्रयत्नाने, कार्यकारी मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सहलीमध्ये सुमारे १५० बंधू भगिनी व मुलांचा सहभाग घेतला होता.

     

आज समाजातील अनेकाना , प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकाना सांधेदुखी, गुडघे दुखी, मानेचे दुखणे , मणक्याचे आजार अशा वेदनादायक व्याधींनी ग्रासले आहे. यावर विविध प्रकारचे उपाय, औषध योजना , शस्त्रक्रिया इ. उपचार प्रचलित आहेत. मंडळाच्या विद्यमाने या विषयावर सखोल समुपदेशन व मार्गदर्शन मिळवण्यासाठी मुलुंड मधील एक नामवंत डॉक्टर हार्दिका कपाडिया, यांचे समुपदेशन दि. १९ जुलै २०१२ रोजी मंडळाच्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमध्ये आयोजित केले होते. मंडळाचे सभासद, समाज बांधव व ज्येष्ठ नागरिकानि या संधीचा चांगला फायदा घेतला.

     

मंडळाच्या वास्तू मध्ये मंगलमय, आनंदी व सात्विक वातावरण रहावे, मंडळाचे कार्यक्रम, उपक्रम, सभारंभ, उत्सव इ. साठी उत्साहाचा व मांगल्याचा माहोल रहावा या साठी विनोबा भावे यांच्या गीताईचे सामुदायिक गीताई पठणाचा कार्यक्रम २ सप्टेम्बर 2012 रोजी आयोजित करण्यात आला होता.

                           
                   
                   
 
 

 

   
 
     
 
 
         
Maratha Mandal Mulund, Maratha Mulund, Maratha Mandal Mulund Mumbai, marathamandalmulund.com, Maratha Vadhu Var Suchak Mandal, Marriage Hall in Mulund
 
All Rights Reserved. Copyright 2012 .
Site Designed & Developed By Arun Chavan